राहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का ?

संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले होते

दिल्ली, 27 आॅगस्ट : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची एकही संधी न सोडणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आता थेट संघाने आपल्याच कार्यक्रमात बोलवण्याची तयारी सुरू केलीये. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींपाठोपाठ आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच राष्ट्रीय परिषद घेणार आहे. याच कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांना आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. नवी दिल्लीत संघाचे 'फ्युचर आॅफ भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलीये. दिल्लीतल विज्ञान भवनात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान 'फ्युचर आॅफ भारत' हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात येणार आहे.

संघाने याआधी जून महिन्यात नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना बोलावले होते. या कार्यक्रमात प्रणवदांनी राष्ट्रवाद या विषयावर भाषण दिले होते. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती रतन टाटा हेही संघाच्या कार्यक्रमात हजर झाले होते. मुंबईत संघाशी संबंधीत 'नाना पालकर स्मृती समिती' च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमात मोहन भागवत यांच्यासोबत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रतन टाटा हेही भाषण करणार होते. पण त्यांनी भाषण करणे टाळले होते. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवायचे नाही, संघ सोडून. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यावर असताना केले होते. यावरून भाजपने संताप व्यक्त केला असून राहुल गांधी अपरिपक्व असून त्यांनी या विधानावर माफी मागण्याची मागणी केली होती.संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुडसोबत केल्यामुळे संघाने आता थेट राहुल गांधी यांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण देणार आहे. त्यामुळे राहुल गांधी हे आमंत्रण स्विकारतात का हे पाहण्याचं ठरणार आहे. VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

Trending Now