ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डही तयार करणार 'सोशल आर्मी'

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हायटेक होण्याचा निर्णय घेतलाय. बोर्डाच्या भोपाळ इथं सुरू असलेल्या बैठकीत खास आयटी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलंय.

महताब आलम, सोनिया राणा, भोपाळ,ता.12 ऑगस्ट : मुस्लिमांच्या प्रश्नावर कायम आक्रमक भूमिका घेणारी संस्था म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड. तिहेरी तलाकसह मुस्लिमांसाठीच्या अनेक सुधारणांना पर्सनल लॉ बोर्ड कायम विरोध करतं. त्यामुळे या संस्थेची ओळख ही सुधारणांना विरोध करत सर्व जाचक परंपरांची समर्थक संस्था अशी झालीय. पण भोपाळमध्ये सुरू असलेल्या बैठकीत या संस्थेनेनं हायटेक होण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी खास आय.टी. तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. सोशल मीडियाचा आधार घेत आपली बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यासाठी बोर्डानं हा निर्णय घेतलाय.पुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंदबोर्डाचे सचिव मोहम्मद उमरैन यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की तिहेरी तलाक, शरियत आणि बोर्डावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅप च्या माध्यमातून बोर्ड आता आपली भूमिका मांडणार आहे.

लोकांपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात चांगलं व्यासपीठ आहे याची जाणीव सर्वच पक्षांना आणि संस्थांना झाली आहे. पण अनेक मुस्लिम संघटना याबाबतीत उदासीन असतात. माध्यमंपर्यंत पोहोचण्यासाठीही याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा उपयोग होतो. कमी पैशात, कमी वेळात आणि जदलगतीने माहिती पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे आता मुख्य माध्यम झालं आहे. याची जाणीव झाल्यानेच बोर्डानं हा निर्णय घेतलाय.  

Trending Now