अजितदादा, माल्या आणि हिरवा देठ!

अजित पवार जेवढे रोखठोक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत, तेवढेच वादग्रस्त विधानासाठी. हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी भाषण करताना अजित पवारांनी आक्षेपार्ह विधान केलंय.

Sonali Deshpande
02 एप्रिल : अजित पवार जेवढे रोखठोक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत, तेवढेच वादग्रस्त विधानासाठी. हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी भाषण करताना अजित पवारांनी आक्षेपार्ह विधान केलंय. मध्यंतरी हिरव्या देठावरून वक्तव्य करणारे गिरीश बापच टीकेचे धनी झाले होते. बापटांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवारांनी विजय मल्ल्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र त्यामुळं त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण 65 व्या वर्षी तिसरं लग्न करणारे विजय मल्ल्या यांचं काय हिरवं आहे हे बघायला पाहिजे असं विधान अजित पवार यांनी केलंय. हल्लाबोल आंदोलनादरम्यान गारगोटीमध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय.

Trending Now