नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुश खबर - ही कंपनी देणार 4,000 नोकऱ्या

पुढील्या तीन महिन्यात किमान 4,000 पदवीधर फ्रेशर्सना नोकऱ्या देणार असल्याचे संकेत टेक महिंद्रा ने रविवारी दिलेत. यापुढे नियुक्त्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे असल्याचे टेक महिंद्राचे मुख्य वित्तीय अधिकारी मनोज भट यांनी स्पष्ट केलेय.

मुंबई, 11 ऑगस्ट : पुढील्या तीन महिन्यात किमान 4,000 पदवीधर फ्रेशर्सना नोकऱ्या देणार असल्याचे संकेत टेक महिंद्रा ने रविवारी दिलेत. यापुढे नियुक्त्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे असल्याचे टेक महिंद्राचे मुख्य वित्तीय अधिकारी मनोज भट यांनी स्पष्ट केलेय. कंपनीने या वर्षात 1800 फ्रेशर्सची नियुक्ति केली असल्याचेही त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितले. तुर्तास आपल्याजवळ निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी, येत्या तीन महिन्यांत आम्ही किमान चार हजार नोकऱ्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जून 2018 पर्यंत 1 लाख 13 हजार 552 होती. गेल्या तीन महिन्यांत त्यात आणखी 745 ने वाढ झाली आहे.पुनरावलोकनांनंतर तीन महिन्यात कंपनीच्यासॉफ्टवेयर विभागात 72462, बीपीओ मध्ये 34,700 आणि सेल्स अँड सपोर्ट मध्ये 6,390 लोग कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रवृत्तीबाबत बोलतांना ते म्हणाले की, उत्तम गुण असलेल्यांच्या जाण्याबाबत आम्ही चिंतीत आहोत, पण त्याचा कंपनीच्या कामावर अजिबात प्रभाव पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.का सोडत आहेत लाखो भारतीय महिला नोकऱ्या

'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाडया दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाहीआदिवासी विभागावर 2 लाख कोटींच्या आरक्षण घोटाळ्याचा आरोप

Trending Now