72nd Independence Day- भारताने 'या' क्षेत्रात केली उल्लेखनीय प्रगती

आज भारतला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७२ वर्ष झाली. या ७ दशकांमध्ये भारताने सामाजिक, आर्थिक आणि राजकारणामध्ये होत गेलेले बदल पाहिले आहे. या ७ दशकांमध्ये भारताने खूप प्रगती केली. चला तर मग या ७१ वर्षांमध्ये भारताने किती प्रगती केली ते पाहूया... लोकसंख्येमध्ये भारताने प्रगती केली आहे. १९४७ मध्ये भारताची लोकसंख्या ३५.९ कोटी होती. आज स्वातंत्र्याच्या ७२  वर्षांनंतर भारताची लोकसंख्या १३४ कोटी आहे. साक्षरतेमध्येही भारताने प्रगती केली आहे. १९४७ मध्ये भारत फक्त १२ टक्के साक्षर होता. पण आज ७२ वर्षांनंतर देशाची साक्षरता ही ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या सात दशकांमध्ये भारताच्या साक्षरतेमध्ये तब्बल ५१७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने खाद्य उत्पादनातही भारताने प्रगती केली आहे. १९४७ मध्ये भारत ५ कोटी टन खाद्य उत्पादन करायचा.आत भारत २८ कोट टन खाद्य उप्तादन करत आहे. १९४७ मध्ये भारत १.७ कोटी टन दूध उत्पादन करायचा. पण आज २०१८ मध्ये भारत तब्बल ५.४ कोटी टन दूध उत्पादन करतो. या ७१ वर्षांमध्ये भारताने दूध उत्पादनात २१८ टक्के वाढ केली. स्वातंत्र्यानंतर रेल्वेचे जाळे अधिक दूरपर्यंत पसरले गेले. १९५० मध्ये भारतीय रेल्वेचे जाळे ५३, ५९६ किमीपर्यंत पसरले होते. मात्र या ७० वर्षांमध्ये हे जाळे ६६, ६८७ किमी लांब पसरले आहे.

Trending Now