Home / News / mumbai /

राष्ट्रपतींनीच टिपू सुलतानचा गौरवार्थ उल्लेख केला होता हे विसरला का? काँग्रेस नेत्याने भाजपला फटकारले

राष्ट्रपतींनीच टिपू सुलतानचा गौरवार्थ उल्लेख केला होता हे विसरला का? काँग्रेस नेत्याने भाजपला फटकारले

मालाडमधील मैदानाला टीपू सुलतानचे (tipu sultan ground malad west) नाव दिल्यामुळे भाजपने जोरदार आंदोलन पुकारले आहे.

मालाडमधील मैदानाला टीपू सुलतानचे (tipu sultan ground malad west) नाव दिल्यामुळे भाजपने जोरदार आंदोलन पुकारले आहे.

मालाडमधील मैदानाला टीपू सुलतानचे (tipu sultan ground malad west) नाव दिल्यामुळे भाजपने जोरदार आंदोलन पुकारले आहे.


मुंबई, 26 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर (mumbai corporation election) मालाडमधील मैदानाला टीपू सुलतानचे (tipu sultan ground malad west) नाव दिल्यामुळे भाजपने जोरदार आंदोलन पुकारले आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का? असा सणसणीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (sachin sawant) यांनी केला आहे. तसंच, 'महापुरुषांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे भाजपाची विकृत पद्धती आहे. टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी भाजपाने पहावी, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

मालाड येथील क्रीडा संकुलाचं टिपू सुलतान असं नामकरण करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख टिपू सुलतान यांच्या नावासाठी आग्रही होते. पण त्याआधीच मैदानाच्या बाहेर प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. भाजपने जोरदार आंदोलन केले आहे. एवढंच नाहीतर पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या मांडला होता. पण, आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला जोरदार उत्तर दिले आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स रद्द

माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

BREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा

Davos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार

EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा

BREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब

'ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. २०१७ ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजप विसरला का? असा संतप्त सवाल  सचिन सावंत यांनी केला आहे.

'इतिहासाला काळा गोरा रंगवून टिपू सुलतानच्या नावाला भाजपा विरोध करत आहे. परंतु कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता "सलाम मंगलारती" करतात. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिरात, टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे. नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले त्याच नेताजींनी टिपू सुलतानाचा शहीद म्हणून उल्लेख करून टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेच्या झेंडा तथा गणवेशावर केला होता' असा दाखलाच सावंत यांनी दिला.

तसंच, 'पेशव्यांच्या सेनेने इंग्रजांशी मिळून श्रींगेरी मठ उद्ध्वस्त केला तेव्हा देवस्थानाचे रक्षण व पुनर्स्थापना टिपू सुलतानने केली होती. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी दिली आहे याची आठवणच सावंत यांनी करून दिली.

'भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत' ही प्रतिज्ञा घेतलेल्या व विविधतेचे निदर्शक तिरंग्यातील तीन रंगांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने भाजप व संघाच्या विकृत विचारधारेचा निकराने विरोध केला पाहिजे', असंही सावंत यांनी ठणकावून सांगितलं.

First published: January 26, 2022, 19:26 IST