पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काय झालं? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेऊन एका महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेशही मुंबई हायकोर्टाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय.

मुंबई, ता. 23 जुलै : मुंबईतील पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काय झालं? असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेऊन एका महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेशही मुंबई हायकोर्टाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय.मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याने उपनगरातील पवई तलाव  ओसंडून लागला आहे ,सुमारे ५२० एकर मध्ये असलेला  हा पवई तलाव पर्यटकांना पावसात  कायमच खुणावत असतो. तलाव ओवर फ्लो झाल्यावर पर्यटक इथे येऊन पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात. मात्र, इथे पर्यटकांचा अतिउत्साह अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतो. मोठ्या प्रमाणात येणारे मलनिस्सारण, घरगुती सांडपाणी आणि सभोवतीच्या निवासी व औद्योगिक पट्ट्यांतून येणारा गाळ ही सर्व कारणे तलावातील पाणी प्रदुषित करित आहेत.  मिठी नदीवर १७८९ साली बांधण्यात आलेला या तलावाचे क्षेत्र २.१ चौरसकिलोमीटर होते आणि खोली ३ ते १२ मीटर इतकी होती. विविध कारणांमुळे तलावाची खोली कमी झाल्याचे समजते. पवई तलावाचे पुनरज्जीवन करावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नसल्याने, पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काय झालं? असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. तसेच, यासंदर्भात संबंधित विभागाच्या तात्काळ बैठका घेऊन, महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.मराठा मोर्चेकरांचं टोकाचं पाऊल, मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरीत सोडली

छाटे-मोठे मिळून मुंबईत एकूण 129 तलाव होते. त्यापैकी अनेक तलाव बुजविण्यात आले. अतिवृष्टीमुळे मुंबई जलमा होण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहे. पवई आणि त्यासारख्या मोठ्या तलावांचा उपयोग कसा करता येईल, याचाही अभ्यास राज्य सरकारला करावा लागेल असे कोर्टाचे म्हणणे आहे.हेही वाचा...औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'मराठा मोर्चेकरांचं टोकाचं पाऊल, मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरीत सोडली

Video- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा

  

Trending Now