HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ सिंघवी बेपत्ता, गाडीत सापडले रक्ताचे डाग

मुंबई, 08 सप्टेंबर : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ सिंघवी गेल्या 5 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघवी मुंबईत कमला मिलच्या कार्यालयातून 5 सप्टेंबरला बेपत्ता झाले तर 6 सप्टेंबरला नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली येथील सेक्टर ११ जवळून सिंघवी यांची गाडी हस्तगत केवी. हा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात घेत एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या सिद्धार्थ सिंघवी यांच्या पत्नी 5 सप्टेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत त्यांची घरी येण्याची वाट पाहत होत्या. पण सिंघवी काही आलेच नाहीत, त्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपली पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलासह सिंघवी हे मुंबईच्या मलबार हिल परिसरात राहतात.5 सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:30 वाजता सिंघवी त्यांच्या ऑफिसमधून निघाले आणि 6 सप्टेंबर रोजी त्यांची गाडी ऐरीलोमध्ये सापडली. धक्कादायक म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले. हे रक्ताचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

सिद्धार्थ सिंघवी यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत आणखी कोणीतरी असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या पोलीस सिंघवी यांचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांचं शेवटचं लोकेशन मात्र कमला मिलच दिसतंय. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.या प्रकरणात, पोलीस आता सिंघवी यांच्या कुटुंबियांची चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ऑफिस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यात आता गाडीत सापडलेले रक्ताचे नमुने काय सांगतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. निकच्या एक्स गर्लफ्रेंडने अखेर मौन सोडलं; प्रियांकाशी झालेल्या एंगेजमेंटबद्दल काय म्हणाली ती?

Trending Now