उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, तीन नेत्यांना केलं निलंबित

पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी शिवसेने आज एक मोठं पाऊल उचललं आहे.

विनया देशपांडे,मुंबई, 13 ऑगस्ट : पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी  शिवसेनेनं आज एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षाबद्दल ठोस भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या 3 नेत्यांना निलंबित केलं आहे. या 3 नेत्यांनी काही प्रकरणात गैरप्रकार केले असल्याने त्यांना निलंबित केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.आरक्षणासाठी आज धनगर समाज रस्त्यावर, राज्यभरात आंदोलनाचा इशारा

दरम्यान, गैप्रकार करणाऱ्या कोणत्याही शिवसैनिकाला शिवसेना सहन करणार नाही अशी ठोस भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे पक्षाला बदनाम करणाऱ्यांवर चपराक बसेल असा यामागचा हेतू आहे.

Trending Now