डी.एस.कुलकर्णी यांचं काय होणार? आज अटकपूर्व जामीनावर सुनावणी

ठेवीदारांचे पैसे परत न केल्या प्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात पुण्यात गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी अटक टाळण्यासाठी डीएसके हायकोर्टात आले आहेत.

Sonali Deshpande
13 फेब्रुवारी : पुण्यातील बांधकाम व्यावसायीक डी. एस. कुलकर्णी हे आज मुंबई हायकोर्टात हजर राहणार आहेत. डीएसके यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे. त्यावर गेल्या वेळी कोर्टाने डी एस के यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. ठेवीदारांचे पैसे परत न केल्या प्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात पुण्यात गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी अटक टाळण्यासाठी डीएसके हायकोर्टात आले आहेत.अटक टाळण्यासाठी डी एस के यांना ५० कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आल होतं पण ते जमा करण्यास डी एस के अजूनही अपयशी ठरले आहेत. यावर तीव्र नाराजी व्यक्त कोर्टाने काहीही करा पण पैसे जमा करा असं म्हणत स्वत: डीएसके यांनी आजच्या तारखेला कोर्टात हजर राहावं असं सांगितलं होतं. त्यानुसार आज ते कोर्टात हजर राहणार आहेत.दरम्यान पुण्यातील बांधकाम व्यावसायीक डी एस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. पुणे सत्र न्यायालयाने नुकताच शिरीष यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर त्यांनी हायकोर्टात आता दाद मागितली आहे.

Trending Now