या दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाही

मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे समाविष्ट झाली आहेत.

मुंबई, 11 ऑगस्ट : मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे समाविष्ट झाली आहेत. एवढंच नव्हे तर या दिग्गजांनी झालेला दंडही भरला नसल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे.वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास सर्वसामान्य नागरिकांवर ट्राफीक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पण जर सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कारवाई होतं असेल का? याचं उत्तर नाही असं आहे. कारण मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान, अर्जून कपूर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं आग्रस्थानी आहेत. सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनं उभी करणे अशा नियमभंगांसाठी हा दंड आकारण्यात आला आहे. मात्र या सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना दंडाचे ई-चलान पाठवूनही त्यांनी हा दंड भरला नसल्याचं समजतंय. याचसंदर्भात विचारणा केली असता आपल्याला या दंडाबाबत काहीही माहित नसून वाहन चालकानं वाहतूक नियम मोडल्याचं स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलंय. मुंबई मिरर'ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा गुन्ह्यांसाठी राज्यभरात दंड आकारला जातो. मुंबईत हा दंड ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीतर तर नियम मोडणाऱ्यांना वाहतूक विभागाकडून ई-चलान पाठवण्यात येते. त्या ई-चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नाही अशी बातमी समोर येते आहे. आत्तापर्यंत एकूण ११९ कोटींचा दंड वसूल होणे बाकी आहे. हा दंड न भरणाऱ्यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलान द्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे. तर राम कदम यांच्या ज्या कारला दंड आकारण्यात आला आहे ती कार आपण काही काळापूर्वी विकल्याचे त्यांनी म्हटले आहे. ई-चलान भरण्यासाठी सक्ती नसल्याने लोक दंड भरत नाहीत असे वाहतूक विभागाने म्हटल्याचेही 'मुंबई मिरर'ने आपल्या वृत्तात स्पष्ट केलंय.

या वृत्तात युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाहनाने डिसेंबर २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सहा वेळा नियम मोडले आहेत. तर, आदित्य ठाकरे यांना कोणतेही ई-चलान प्राप्त झाले नसून, कारचालकानेच वाहतूकीच्या नियमांचा भंग केला असावा असे हर्षल प्रधान यांनी म्हटले आहे.नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यातVIDEO थरार : केरळ - चिमुकल्याचा जीव वाचवताना जवानानं लावली जीवाची बाजीगोमांस खाणारे जवाहरलाल नेहरू ‘पंडित’ नाही, भाजप आमदारांचे खळबळजनक वक्तव्य 

Trending Now