राम कदम यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे- उद्धव ठाकरे

आता भाजपला 'बेटी बचाओ'चा नारा द्यावा लागणार आहे.

मुंबई, ०५ सप्टेंबर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार राम कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आणि भाजप पक्षाने राम कदमवर लवकरात लवकर कारवाई करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. इतिहासात ज्याप्रकारे वाल्याचा वाल्मिकी झाला तसा जर भाजप करु पाहत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. एकीकडे भाजप बेटी पढाओ बेटी बचाव असा नारा देत असताना त्यांचे आमदार मात्र असे काही वक्तव्य करतात ज्यामुळे त्यांना आता 'बेटी बचाओ'चा नारा द्यावा लागणार आहे.भारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केल्याचा दावा करणाऱ्या राम कदमांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राम कदम मुलींना पळवून आणण्याची वार्ता करताना दिसत आहेत. जर मुलाला आणि त्याच्या आई- वडिलांना मुलगी पसंत असेल तर मी त्यांच्यासाठी ती मुलगी पळवून आणणार असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं होतं. नेमकी त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.हे कमी की काय बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईसाठी कदमांनी गोविंदांचा अपमान केल्याचे मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. त्याचे झाले असे की, सातव्या थरापर्यंत चढलेल्या गोविंदाला राम कदम यांनी बळजबरीने खाली उतरवलं. त्यामुळे गोविंदा पथकाचा हिरमोड झाला. त्यामुळे दहीहंडीचं आयोजन गोविंदा पथकासाठी की अजून कोणासाठी असा सवाल उपस्थितीत होत आहे.

राम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पाहा हा VIDEO

Trending Now