PHOTOS: मन हेलावून टाकणारे शहीद कौस्तुभ राणेंचे कौटुंबिक फोटो

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्टाचा वीरपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्याने शत्रूशी दोन हात करताना वीरमरण स्वीकारलं. सध्या सोशल मीडियावर कौस्तुभ यांचे लहापणीचे आणि खासगी फोटो शेअर होत आहेत.

कौस्तुभ यांच्या मुलाचा बारशावेळचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये त्यांचं संपूर्ण राणे कुटुंब दिसत आहे. आपल्या तान्ह्या मुलासोबत दुकानामध्ये त्यांचा हा फोटो मन सुन्न करणारा आहे. शहीद कौस्तुभ यांचा पत्नीसोबतचा हा फोटोही डोळ्यांच्या कडा ओलावणारा आहे. बहिणीसोबत कौस्तुभ यांचे हे फोटो भावूक करणारे आहेत. कौस्तुभ यांच्या पश्चात त्यांची पत्नी कनिका, दोन वर्षाचा मुलगा, आई- वडिल आणि एक बहिण आहे.

Trending Now