'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील यांचं अजब विधान

राज्यातील खड्यांचं खापर त्यांनी मुंबई महापालिकेवर फोडलं

मुंबई, 15 जुलै : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या अजब विधानावरून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्यातील खड्यांचं खापर त्यांनी मुंबई महापालिकेवर फोडलं आहे. राज्यातील खड्यांबद्दल त्यांना विचाले असता, 'मला माहित नाही नक्की कोणती घटना आहे,' असे उत्तर त्यांनी दिले. एवढे बोलून ते थांबले नाहीत तर 'खड्यांची जबाबदारी ही महापालिकेची आहे. 5 बळी जरी गेले असले तरी त्या रस्त्यांवरून 5 लाख लोक घरी सुरक्षित जातात ना...' असं अजब विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून त्यांनी खड्यांना अप्रत्यक्ष समर्थनच दिलं आहे.चंद्रकांत पाटलांना मुंबईतल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल छेडलं असता त्यांनी शिवसेनेकडं बोट दाखवत महापालिकेकडं या रस्त्यांची जबाबदारी असल्याचं म्हटलंय. पाटील यांच्या या विधानाचे विरोधकांकडून जोरदार टीका होत असून, सरकारला मृतांचे सोयर सुतक नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

Trending Now