टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुलीवर हल्ला करणाऱ्या 2 हल्लेखोरांना अटक

टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुली हिच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. वर्सोवा इथे रूपाली गांगुली त्यांच्या कारमध्ये असताना हल्लेखोरांनी काच फोडून त्यांच्यावर हल्ला केला.

मुंबई, 04 आॅगस्ट : टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुली हिच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. वर्सोवा इथे रूपाली गांगुली त्यांच्या कारमध्ये असताना हल्लेखोरांनी काच फोडून त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पाच तासात मुंबई पोलिसांनी एका हल्लेखोराला डहाणूतून आणि दुसऱ्या हल्लेखोराला परेलमधून पकडलं.हेही वाचासासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

फ्रेंडशिप डेच्या आधीच प्रेमाचा स्वीकार नाही केला म्हणून मैत्रिणीचा खून2019मध्ये रायबेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयीरूपाली गांगुली ही बरीच वर्ष छोट्या पडद्यावर झळकत असते. साराभाई वर्सेस साराभाई, परवरीश, बा, बहू और बेबी अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये रूपालीनं भूमिका साकारल्यात . रूपाली 7 वर्षाची असताना पहिल्यांदा 'साहब' या सिनेमात झळकली होती. तिनं अनेक रिअॅलिटी शोही केलेत. बिग बाॅसच्या पहिल्या सिझनमध्ये ती होती. जरा नच के दिखा, फिअर फॅक्टर, किचन चॅम्पियन या रिअॅलिटी शोजमध्ये ती स्पर्धक होती. तिनं दशावतार या अॅनिमेटेड फिल्मला आपला आवाजही दिला होता.  दूरदर्शनवरच्या बायोस्कोप शोची ती अँकर होती.रूपाली प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल गांगुलींची मुलगी आहे. कोलकत्त्याला जन्मलेल्या रूपालीचं करियर मुंबईत घडलं. अश्विन वर्मा यांच्यासोबत तिनं काही वर्षांपूर्वी लग्न केलं.रूपालीवर झालेल्या हल्ल्यामागचं कारण अजून कळलं नाहीय.

Trending Now