दादरच्या या दहीहंडीचा थरार तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल!

मुंबई, ३ सप्टेंबर : दादर स्टेशनजवळ एका दहीहंडीच्या थरांचा थरार कॅमेऱ्यानं टिपलाय. श्री वरदान गोविंदा पथकातला एक चिमुकला गोविंदा सगळ्या वरच्या थरावर स्वार होण्यात यशस्वी झाला. तो हंडीजवळ पोहोचला आणि.... खालच्या थरांचा डोलारा कोसळला. प्रसंगावधान राखून सुरक्षा पट्ट्याच्या मदतीने हा छोटा गोविंदा दोरीला धरून राहिला. त्यामुळे ३० फुटांपेक्षा जास्त उंचीवर काही वेळ अधांतरी लटकताना दिसला. दहीहंडीच्या खेळात स्पर्धेमुळे अनेक गोविंदा जखमी होत असतात. त्या पार्श्वभूमीवर या अधांतरी लटकणाऱ्या छोट्या गोविंदाला सुरक्षित खाली उतरवण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरले आणि बघणाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.

Your browser doesn't support HTML5 video.

मुंबई, ३ सप्टेंबर : दादर स्टेशनजवळ एका दहीहंडीच्या थरांचा थरार कॅमेऱ्यानं टिपलाय. श्री वरदान गोविंदा पथकातला एक चिमुकला गोविंदा सगळ्या वरच्या थरावर स्वार होण्यात यशस्वी झाला. तो हंडीजवळ पोहोचला आणि....खालच्या थरांचा डोलारा कोसळला. प्रसंगावधान राखून सुरक्षा पट्ट्याच्या मदतीने हा छोटा गोविंदा दोरीला धरून राहिला. त्यामुळे ३० फुटांपेक्षा जास्त उंचीवर काही वेळ अधांतरी लटकताना दिसला. दहीहंडीच्या खेळात स्पर्धेमुळे अनेक गोविंदा जखमी होत असतात. त्या पार्श्वभूमीवर या अधांतरी लटकणाऱ्या छोट्या गोविंदाला सुरक्षित खाली उतरवण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरले आणि बघणाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.

Trending Now