मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस अपघात टळला

सुनीलकुमार यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच शेकडो लोकांचे जीव वाचले.

मुंबई, ३१ जुलैः खंडाळा घाटात मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅकला तडा गेला. रुळ तुटला असल्याचे सुनीलकुमार या रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. डाऊन लाइनच्या रुळाला तडा गेल्याचे सुनीलकुमार यांच्या लक्षात आले. ही घटना मंकी हिलजवळ सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली. त्यामुळे ही रेल्वे २५ मिनिटं उशिराने धावत होती. तसेच त्यामागून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्याही उशिराने धावत आहेत. सुनीलकुमारच्या सतर्कतेमुळ त्या मार्गावरून जाणारी मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस थांबवण्यात आली आणि मोठा अपघात टळला. सुनीलकुमार यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच शेकडो लोकांचे जीव वाचले.  

Trending Now