शिवसेनेच्या मेंदूत झोल झोल म्हणून भूमिका गोल गोल -विखे पाटील

" कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका कायम गोंधळाची असून 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडा सरकारनं आणला कुठून ?"

Sachin Salve
23 जुलै : शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचं सोडून एका आरजेविरोधात शिवसेनेचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळेच सेनेच्या मेंदूत झोल झोल झाला आणि भूमिका गोल झालीये अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. तसंचकर्जमाफीबाबत सरकारची भूमिका कायम गोंधळाची असून 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडा सरकारनं आणला कुठून असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केलाय.पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर सडकून टीका केली.

सत्तेत आल्यापासून शिवसेनेची भूमिका कायम संशयास्पद राहिलीये. अलीकडे आरजे मलिष्काने केलेल्या गाण्यावर सेनेनं गोंधळ घातलाय. मलिष्काच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे. आता यापेक्षा वैचारिक दिवाळखोरी असूच शकत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मेंदूत झोल झोल आहे आणि भूमिका गोल गोल आहे असं सांगत शिवसेना म्हणजे एफएम रेडिओ झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी केलीये.

Trending Now