उद्याच्या काँग्रेस बंदला मनसेची साथ, आक्रमक होण्याची मनसैनिकांना सूचना

मुंबई, 09 सप्टेंबर : पट्रोल, डिझेलच्या महागाई विरोधात काँग्रेसने सोमवारी बंद पुकारलाय शिवसेना-मनसेनं मतभेद विसरून या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन कॉंग्रेसने केल होतं. त्याला आता मनसेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये मनसेची साथ असणार आहे.इंधन दरवाढीसाठी आता महाराष्ट्रात मनसे रस्त्यावर उतरणार आहे.इंधन दरवाढीविरोधात उद्या काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला शिवसेना आणि मनसेनंही पाठींबा द्यावा असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होत. त्याला आज मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. पेट्रोल जिझेल दरवाढीविरोधात सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात मनसे बंद करणार आहे.

दरम्यान या बंदला मनसेनं आधीच पाठिंबा दर्शवलाय. आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते पाहावं लागलं. शिवसेना आणि मनसेनं मतभेद विसरून या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन काँग्रेसनं केलंय. त्यावर मनसेने हात पुढे केला आहे.तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी असताना आता शिवसेनेनेही मित्रपक्षावर निशाणा साधलाय. मुंबईमधल्या काही पेट्रोल पंपावर वाढत्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीवरुन यही है अच्छे दिन असे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये नेमकं काय होणार हे महत्त्वाचं आहे.

Trending Now