रुग्ण दगावल्याचं खापर पोलिसांच्या माथी, सुरक्षा दलावरच केली दगडफेक

मुंबईतल्या सायन येथील टिळक रुग्णालयात एका रुग्णाचा उपाचारदारम्यान मृत्यू झालाया यावर मृतकाच्या नातेवाईक आणि मित्रांनी आपला राग पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करून व्यक्त केला.

मुंबई, 23 जुलै : मुंबईतल्या सायन येथील टिळक रुग्णालयात एका रुग्णाचा उपाचारदारम्यान मृत्यू झालाया यावर मृतकाच्या नातेवाईक आणि मित्रांनी आपला राग पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करून व्यक्त केला. यात दोन पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे तीन असे पाच जवान जखमी झाले आहेत तर या जमावाने पोलिसांच्या तीन गाड्या फोडल्या आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी 100 अज्ञात जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला करण्यात आला.यात जखमी झालेल्या जवानांवर सध्या त्याच रुग्णलयात उपचार सुरू आहेत. धारावी पोलिसांनी चोरी प्रकरणी येथील सचिन रवींद्र जैस्वार वय 17 वर्षे नावाच्या युवकाला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्याला पोलिसांनी जबर मारहाण केली होती. त्यानं गुन्हा कबुल केला नाही म्हणून त्याला शुक्रवारी सोडून दिलं होतं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली म्हणून त्याचा नातेवाईकांनी शनिवारी टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं.'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!

शनिवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच सचिनचा मृत्यू झाला असा सचिनच्या वडिलांनी आरोप केला आहे. तर त्याला लेप्टो स्पायरोसिस झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांवर आणि काही गाड्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून परिस्थिती शांत केली.हेही वाचा...कर्णबधीर मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य कर्णबधिर संघटना उतरली रस्त्यावरVIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'

Trending Now