मुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप

मुंबई आणि पुण्यात आज ओला आणि उबर चालकांचा संप आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि पुणेकरांना याचा त्रास होणार हे नक्की.

Renuka Dhaybar
19 मार्च : मुंबई आणि पुण्यात आज ओला आणि उबर चालकांचा संप आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि पुणेकरांना याचा त्रास होणार हे नक्की. दरम्यान, उत्पन्नात घट झाल्यामुळे आणि नव्या गाड्या घेणं बंद करा या मागणीसाठी हा संप करण्यात आला आहे.आज ओला आणि उबर चालक यासंबंधी आपलं अॅप बंद करून ऑफलाईन जाऊन आपला निषेध व्यक्त करणार आहे. जेव्हा ओला आणि उबरची सेवा सुरू झाली तेव्हा चांगले पैसे मिळायचे, पण जशा गाड्या वाढल्या तशी आमची भाडी कमी झाली आहे. त्यामुळे आमच्या कमाईत आणि त्यामुळे उत्पन्न घटल्याचा दावा चालक करतायत.काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या मुजोरीमुळे सुरुवातीला ओला आणि उबरला मोठा प्रतिसाद मिळाला. पण आता मात्र त्यांना तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये. कुढेही जायचं असेल तर ओला आणि उबरची सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर आहे. पण आजच्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होणार हे नक्की.

Trending Now