शौचालयाच्या छतावर मोबाईल ठेऊन 'तो' करायचा महिलांची व्हिडिओ रेकॉर्डिंग

आताच्या काळात सगळ्याच महिला मोठमोठ्या ऑफिसात कामाला जातात. पण तिथेही त्या सुरक्षित नाही असा दाखला देणारा प्रकार चर्नी रोड परिसरात घडला आहे.

मुंबई, 06 ऑगस्ट : शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता यात सगळ्यात असुरक्षित ह्या महिलाच आहेत. आणि आताही असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. आताच्या काळात सगळ्याच महिला मोठमोठ्या ऑफिसात कामाला जातात. पण तिथेही त्या सुरक्षित नाही असा दाखला देणारा प्रकार चर्नी रोड परिसरात घडला आहे. खासगी कंपनीच्या महिला शौचालयात ऑफिस बॉय मोबाईलद्वारे त्यांचे व्हिडिओ शूट करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चर्नी रोडच्या एका खासगी कंपनीमध्ये एका महिला कर्मचाराच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकिस आला. या संपूर्ण प्रकाराची त्यांना भनक लागताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिला शौचालयातून त्यांचे व्हिडिओ शूट करणारा ऑफिस बॉय अरविंद विठ्ठल अहिरे (32)याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.VIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'

हे सगळं समजताच महिलेने वरिष्ठांकडे धाव घेतली आणि त्यानंतर या धक्कादायक प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या तपास उघड झालं की तो मोबाईल अरविंदचा होता. हे समजताच त्याने तिथून पळ काढला. अरविंद अहिरे हा चेंबूर परिसरात राहणारा आहे.

नाका, तोंडात Fevikwik टाकून त्यानं पत्नीचा जीव घेतला

या सगळ्या प्रकाराची तरुणीने थेट डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी अरविंद अहिरेच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खरं तर प्रकारातून सतर्क होऊन प्रत्येक महिलेने आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय घडत आहे याकडे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढल्यास त्याबद्दल आधी पोलिसांना सांगणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या सोबत असं कोही होत नाही आहे ना याची काळजी घ्या.हेही वाचा...मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री

मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा

मराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप

Trending Now