'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या दिग्दर्शकाला अटक,34 कोटींची फसवणूक?

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टेला पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर 34 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार गुट्टेला मुंबईत अटक करण्यात आलीय.

मुंबई, 03 आॅगस्ट : 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टेला पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर 34 कोटींची फसवणूक  केल्याचा आरोप आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार गुट्टेला मुंबईत अटक करण्यात आलीय. 14 आॅगस्टपर्यंत गुट्टेला आॅर्थर रोड तुरुंगात ठेवणार आहेत. या बातमीनुसार गुट्टेची कंपनी व्हीजीआर काॅर्प प्रायव्हेट लिमिटेडनं चुकीचं बिल देऊन 34 कोटी रुपयांची जीएसटीसंबंधी फसवणूक केलीय. गुट्टेवर कलम 132 (1) लावलंय.विजय गुट्टे 'इमोशनल अत्याचार', 'टाइम बारा वेट' आणि 'बदमाशियां' हे सिनेमे बनवलेत. The Accidental Prime Minister हा सिनेमा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आहे. संजय बारू यांच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतलाय. दोन वर्षांपूर्वी या पुस्तकावर बराच गदारोळ झाला होता. माजी प्रसिध्दी प्रमुख संजय बारू यांनी माझ्या वडिलांचा विश्वासघात केला असून बारूंचे वर्तन म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची  मुलगी उपिंदर सिंग यांनी व्यक्त केलं होतं. संजय बारू यांच्या पुस्तकाबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाकडून प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. पंतप्रधानांच्या सर्वात मोठी मुलगी आणि इतिहासकार उपिंदर सिंग यांनी संजय बारूंवर जोरदार टीका केली होती.पंतप्रधानान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर त्यांचे माजी प्रसिध्दी प्रमुख संजय बारु यांनी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर - द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक लिहीले असून यात मनमोहन सिंग दुबळे पंतप्रधान असल्याचे म्हटले होते. यावरुन विरोधकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांच्या बचावासाठी त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग या मैदानात उतरली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. दरम्यान, बारूंच्या पुस्तकावर प्रियांका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझी आई सोनिया गांधी या सुपर पीएम नव्हत्या. मनमोहन सिंगच सुपर पीएम होते असे प्रियांका गांधींनी म्हटले होते.हा वादग्रस्त सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Trending Now