धक्कादायक: नवी मुंबईत एकाच शाळेतील 5 मुलं बेपत्ता

विनय म्हात्रे, प्रतिनिधीनवी मुंबई, 06 सप्टेंबर : नवी मुंबईतील रबाळे येथे एक धक्कादायक प्रकार धडला आहे. रबाळे येथील 5 शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. काल दुपारपासून ही 5 मुलं बेपत्ता आहेत. अजूनही त्यांचा काही तपास लागलेला नाही. ही पाचही मुले रबाळेमधील आदिवासी कातकरी पाड्यामधील राहणारे विद्यार्थी आहेत. ही पाचही मुलं एकाच शाळेत शिकणारी आहेत. इयत्ता दुसरी ते सहावीमधील शिकणारे हे विद्यार्थी आहेत.बेपत्ता झालेल्या 5 मुलांची नावं

1) शंकर तेजवंत सिंह, वय 112) गगन तेजवंत सिंह, वय 8 (दोघंही भावंड आहेत.)3) अर्जुन ढमढेरे, वय 114) रोहित जैस्वाल, वय 135) अनिस आदिवासी, वय 11काल दुपारी रबाळेमधील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील हे 5 विद्यार्थी शाळेजवळ खेळत होती. दुपारी 1 वाजता अचानक ही मुलं दिसेनाशी झाली. त्यानंतर त्यांचा आदिवासी पाड्यातील सगळ्यांनी त्यांचा शोध घेतला पण ही मुलं कुठेही सापडली नाही. या मुलांना बेपत्ता होऊन आता 24 तास उलटून गेले आहेत.रात्रभर वस्तीतील लोकांनी या मुलांना शोध घेतला पण त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आता पोलीस फौजही या मुलांना शोधण्यासाठी कामाला लागली आहे.दरम्यान, या मुलांना कोणी बेपत्ता केलं? आणि यामागे काही कोणाचा काय हेतू असेल असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहतात आणि पोलिसांकडूनही याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. PHOTO : या सेलेब्रिटी LGBT आहेत माहिती आहे का?

Trending Now