Shocking :नराधमाचा कुत्रीवर बलात्काराचा प्रयत्न,प्राईव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकून घेतला जीव

अत्याचार करण्यास असमर्थ राहिल्यामुळे संतापलेल्या प्रेम सिंहने हे कृत्य केलंय. या अमानवी अत्याचारामुळे कुत्रीची दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबई, 23 आॅगस्ट : वासनेच्या आहारी गेलेला माणूस कोणत्या थराला पोहोचू शकतो याचा काही नेम नाही. मानव जातीला कलंक लावणारी अशीच एक घटना मुंबईत घडलीये. एका नराधमाने चक्क कुत्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न फसला म्हणून या नराधमाने कुत्रीच्या प्राईव्हेट पार्टमध्ये लोखंडी राॅड टाकला. यात तिचा मृत्यू झाला. ही संजापकनक घटना कांदिवलीमध्ये घडली.कांदिवली परिसरात आरोप प्रेम सिंह हा एका खासगी इमारतीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. तो एका प्रकाश नावाच्या सिक्युरिटी कंपनीसाठी काम करत होता. ज्या ठिकाणी प्रेम सिंह नोकरीला होता त्याच परिसरात काही कुत्रे होते. प्रेम सिंहने आपली वासना पुर्ण करण्यासाठी एका कुत्रीला पकडले. त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण कुत्रीने त्याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या प्रेम सिंहने कुत्रीच्या प्राईव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकला. अत्याचार करण्यास असमर्थ राहिल्यामुळे संतापलेल्या प्रेम सिंहने हे कृत्य केलंय. या अमानवी अत्याचारामुळे कुत्रीची दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे या कुत्रीने काही दिवसांपूर्वीत सात पिल्लांना जन्म दिला होता.ही घटनासमोर आल्यानंतर प्राणी संरक्षण संस्थेने कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रेमसिंहला बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरोधात अज्ञात आरोपी म्हणून कलम 428, 429, 11A, 119 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. दरम्यान, आरोपी प्रेम सिंहला जामिनावर सोडण्यात आलंय.

मानसोपचार तज्ञांच्या मते अशा प्रकरणातील आरोप हे समाजासाठी धोकादायक आहे. खास करून लहान मुलांसाठी अशा आरोपींकडून अधिक धोका असतो. अशा मानसिकतेची लोकं वासनेच्या भरात कोणत्याही थराला पोहोचू शकतात.प्राण्यावर अत्याचार करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मागील महिन्यात हरियाणातील मेवातमध्ये एका बकरीवर आठ लोकांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी बकरीचा मृत्यू झाला. बकरीच्या मालकाने २६ जुलैला या प्रकरणी तक्रार नोंदवली. मृत बकरीची वैद्यकीय चाचणी केली असून, लवकरच त्याच्या अहवाल मिळेल. ज्या बकरीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला ती बकरी गरोदर होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.PHOTOS : तिच्या अंगात राक्षस होता,आईने 4 महिन्याच्या मुलीचा कापला ब्लेडने गळा !

Trending Now