मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत काही दिवसांपूर्वी कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) धडकली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. शहरात कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांची आकडेवारी अचानक वाढू लागल्याने प्रशासनासह मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. नव्या बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ओमायक्रोन विषाणूपासून (Omicron) बाधित असल्याची देखील माहिती समोर आली होती. कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत होता. त्यामुळे मुंबईत पुन्हा नव्याने निर्बंध लागू (Corona restrictions in Mumbai) करण्यात आले होते. अखेर तीन आठवड्यांनी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय. कारण दैनंदिक रुग्णवाढ ही 20 हजारांच्या पार गेली असताना हळूहळू ही आकडेवारी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे.
मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 858 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 656 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 185 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान कोरोना संसर्ग वाढीचा दर 0.37 टक्के इतका आहे.
Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा
माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
BREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा
पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा
EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी
BREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब
Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी
OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान
Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स रद्द
BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?
Davos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार
(नितेश राणेंच्या पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात उद्या जामीनावर सुनावणी)
मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर 15 जानेवारीला 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर हळूहळू ही रुग्णसंख्या दररोज कमी झाली. 15 जानेवारीनंतर दुसऱ्याच दिवशी नव्या बाधितांच्या आकडेवारीत 2 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कमी झाल्याचं बघाया मिळालं होतं. रुग्णांची कमी संख्या ही दररोज दोन हजारांच्या फरकाने कमी होऊ लागली होती. 21 जानेवारीला 5008 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 22 जानेवारीला हाच आकडा 3568 वर पोहोचला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही आकडेवारी आणखी एक हजाराने खाली घसरली होती. मात्र, गेल्या दिवसांपासूनची आकडेवारी ही 1800 ते 1850 च्या दरम्यान बघायला मिळत आहे. ही आकडेवारी देखील लवकरच खाली घसरेल आणि मुंबईत कोरोना परिस्थिती पूर्णपणे सुधारेल, अशी आशा आहे.
मुंबईतील गेल्या काही दिवसांपासूनची नवी रुग्णसंख्या (आकडेवारीत)
26 जानेवारी - 1858
25 जानेवारी - 1815
24 जानेवारी - 1857
23 जानेवारी - 2550
22 जानेवारी - 3568
21 जानेवारी - 5008
20 जानेवारी - 5708
19 जानेवारी - 6032
18 जानेवारी - 6149
17 जानेवारी - 5956
16 जानेवारी - 7895
15 जानेवारी - 10661
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.