मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम

लहान वाहनांनादेखील टोलमधून सुटका मिळणार नाही

मुंबई, १२ सप्टेंबर-  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल सुरुच राहणार. या महामार्गावरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायची नाही किंवा हलक्या वाहनांना त्यात सूट द्यायची नाही, असा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमित मलिक अहवाल व अन्य तपशिलाचा विचार करून घेतला आहे. पुढील १२ वर्ष तरी एक्स्प्रेस वेवरील टोल बंद होणार नसल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास करताना टोलसाठी तुमचा खिसा रिकामा होणं अटळ आहे. कारण मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमित मलिक अहवालाचा दाखला देत मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलबंदी कायमची बंद करणं अशक्य असल्याचं सांगितलं. तसं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलंय.लहान वाहनांनादेखील टोलमधून सुटका मिळणार नाहीय. दरम्यान मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरची टोलबंदी शक्य आहे की नाही या प्रश्नावर उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेच्या निमित्तानं खलबतं झाली. मात्र प्रवाशांना दिलासा देण्यात सरकारला यश आलेलं दिसत नाही.

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

Trending Now