'या' कारणामुळे क्रिस्टल टॉवरमध्ये झाला दोघांचा मृत्यू

इमारतीतील रहिवाशी आपला जीव मुठीत धरून वाट मिळेल तिथून पळण्याचा प्रयत्न करत होते

मुंबई, २२ ऑगस्ट- मुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या इमारतीतील रहिवाशी आपला जीव मुठीत धरून वाट मिळेल तिथून पळण्याचा प्रयत्न करत होते. याच प्रयत्नात एक वृद्ध महिला आणि पुरूष यांनी लिफ्टचा पर्याय निवडला. मात्र आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करु नये ही प्राथमिक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. जीव वाचवण्याच्या नादात ते लिफ्टमध्ये शिरले. मात्र लिफ्ट आगीच्या कचाट्यात सापडली आणि ती मध्येच बंद पडली. यामुळे गुदमरून वृद्ध महिलेचा आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला.एकीकडे सुजाण नागरिक अशा चुका करुन आपली जीव धोक्यात घालत आहेत तर दुसरीकडे याच इमारतीतील १० वर्षांच्या झेनने प्रसंगावधान दाखवून आठ जणांचे प्राण वाचवले. झेनने हाताला लागतील ते सर्व कपडे आई- बाबांना पाण्यात भिजवायला सांगितले. भिजलेले कपडे अंगावर ओढून घेऊन केसांवर सतत पाणी ओतण्यास सांगितले. तसेच गुदमरून श्वास कोंडू नये यासाठी तिने ओला कपडा नाकावर धरायला सांगितला. यानंतर घाबरून न जाता सर्वांना खाली बसून राहायला सांगितले.आग लागल्यावर तोंडावर ओला कपडा घ्यावा, अंगावर ओले कपडे घ्यावे तसेच डोक्यावर सतत थंड पाणी मारत राहिल्यावर माणूस पॅनिक होत नाही तर तो शांत राहतो. या शाळेत शिकलेल्या गोष्टी झेनने खऱ्या आयुष्यात वापरत अनेकांचे प्राण वाचवले. झेनने सांगितलेल्या गोष्टी इतरांनी ऐकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. झेनच्या या प्रसंगावधनाने थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी या कुटुंबाची आणि इतर सदस्यांची सुटका केली.१६ मजली या इमारतीत १२ व्या मजल्यावर रिनोवेशनचे काम सुरू होते. कामादरम्यान शॉर्टसक्रिट झाले आणि आगीने भडका घेतला. या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली. तसेच इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यरत नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग नियंत्रणात आणायला वेळ लागला. अतिरिक्त गाड्या आणि सामान आणावे लागले. याचा फटका तिथल्या रहिवाश्यांना बसला.

VIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वनव्यातून वर ओढून काढलं महिलेला

Trending Now