मुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये आग, चार जणांचा मृत्यू

या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली

मुंबई, २२ ऑगस्ट- मुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर  आठजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. तर अजून दोघांची ओळख पटणे बाकी आहे. वृद्ध महिला आणि पुरूष यांचा लिफ्टमध्ये गुदमरून मृत्यू झाला.  तर दोघांचा आगीत जळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यापैकी २५ जणांना वाचवण्या जवानांना यश आले आहे. १२ जणांना उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शॉर्टसक्रिटमुळे इमारतीत आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निवासी इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांना क्रेनच्या सहाय्याने इमारतीतून बाहेर काढण्यात येत आहे.१६ मजली या इमारतीत १२ व्या मजल्यावर रिनोवेशनचे काम सुरू होते. कामादरम्यान शॉर्टसक्रिट झाले आणि आगीने भडका घेतला. या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली. तसेच इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यरत नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग नियंत्रणात आणायला वेळ लागला. अतिरिक्त गाड्या आणि सामान आणावे लागले. याचा फटका तिथल्या रहिवाश्यांना बसला. दरम्यान, या घटनेची पूर्ण चौकशी केली जाणार असून इमारतीच्या बिल्डरवर आणि मॅनेजमेन्टवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

Trending Now