Mumbai Rains: मुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट

हतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत विमानतळावर पोहोचता आले नाही

मुंबई, 10 जुलैः मुंबईत होणाऱ्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे गाड्याही उशिराने धावत आहेत. या सर्वाचा फटका विमान प्रवासावरही झाला. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत विमानतळावर पोहोचता आले नाही. त्यामुळे अनेकांच्या फ्लाइट चुकल्याही. पण जेट एअरवेजने त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत सुमारे 182.37 एमएम पाऊस झाला आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण 1820 एमएम पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी मुंबईमध्ये एकूण 1066.20 एमएम पाऊस झाला होता. गेल्यावर्षीपेक्षा मुंबईत यावर्षी 747 एमएम जास्त पाऊस झाला आहे. तसेच अजून दोन दिवस तरी पावसाचा जोर कायम राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशा देण्यात आला आहे.हेही वाचाःपावसामुळे जागोजागी कोंडी, घराबाहेर न पडण्याचा सल्लापुराच्या पाण्यात तरुण गेला वाहूनभरपावसात लोकस सुसाट

Trending Now