मुंबईत भरघाव वेगातल्या जॅग्वारने उडवलं 10 गाड्यांना !

मुंबईतील वर्सोवा परिसरात एक धक्कादायक अपघात घडला आहे.

News18 Lokmat
मुंबई, 24 जुलै : मुंबईतील वर्सोवा परिसरात एक धक्कादायक अपघात घडला आहे.  जॅग्वार कारने 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या धडकेत चार जण गंभीर झालेत. त्यांना जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. ही जॅग्वार कार प्रचंड वेगात असल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शांनचं म्हणणं आहे. या धडकेत कारचा पुढचा भाग पुर्णत: चेपला गेलाय. आणि कारचंही प्रचंड नुकसान झालंय.ही जॅग्वार कार इतक्या वेगात होती त्या कारने चक्क 10 गाड्यांना धडक मारली आहे. या भीषण अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरघाव वेगात जॅग्वार चालवणाऱ्या चालकाची ओळख पटली आहे. हितेश असं त्या कार चालकाचं नाव आहे. ते 45 वर्षांचे असून ते एअर कंडीशनिंग कंपनीचे संचालक असल्याची माहिती आहे. गाडीतून रिकाम्या सीरिंग ताब्यात घेण्यात आल्या आहेत.VIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तौबा' गर्दी

अपघातानंतर कार चालकाला स्थानिक लोकांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा ताबा मिळवला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गाडी चालवताने दारूच्या नशेत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आता त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा...मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवरमराठा मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाकबापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

Trending Now