ईएमआयसाठी सिद्धार्थ संघवीची हत्या, ड्रायव्हरच निघाला मारेकरी

अक्षय कुडकेलवार, मुंबई 10 सप्टेंबर : बुधवारपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी

संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या सरफराज शेख नावाच्या चालकानंच सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचं उघड झालंय.धक्कादायक बाब म्हणजे ईएमआयच्या 30 हजार रूपयांसाठी मारेकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येतेय.घटनेच्या दिवशी आरोपी सरफराज शेखनं सिद्धार्थ संघवी यांना लुटण्याचा प्रयत्न केला.सरफराजनं सिंघवी यांच्याकडचा ऐवज लुटण्यासाठी चाकुने वार केले.,चाकुहल्ल्यात सिंघवी यांचा मृत्यू झाला.पेशानं ड्रायव्हर असलेल्या सरफराजनं सिद्धार्थ सिंघवी यांचा मृतदेह गाडीत कोंबून कल्याण जवळच्या मलंगडमध्ये नेऊन फेकला.दरम्यान, सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांनी ते हरवल्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तपासदरम्यान पोलिसांना संघवी यांची कार नवी मुंबईत आढळून आली. मारेकऱ्यानं संघवी यांचा मोबाईल चोरला होता आणि तीच त्याची घोडचूक ठरली.मोबाईलच्या मदतीनं पोलीस आरोपी सरफराजपर्यंत पोहोचले.गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याशिवाय राहत नाही.संघवी यांच्या हत्याप्रकरणाचा छडा लावणाऱ्या मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा याची प्रचिती आणून दिलीय. --------------------------VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

Trending Now