मुलुंडमध्ये रिक्षेवर पिंपळाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू, दोनजण जखमी

या भागातील स्थानिकांनी या झाडासंदर्भात महापालिकेकडे तक्रार नोंदवली होती.

ठाणे, २४ जुलैः मुलुंड पश्चिम येथील मुलुंड कॉलोनीत असलेल्या गुरूगोविंद रोडवरील हिंदुस्थान चौकात पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी चालत्या रिक्षावर कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून रिक्षा चालक आणि महिला गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही जवळच्या अग्रवाल रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.झाडाची मोठी फांदी रिक्षावर कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या रिक्षातून जखमी झालेल्यांना बाहेर काढलं. त्यांना त्वरित रुग्णलयात उपचारासाठी नेलं. पण उपचारांदरम्यान एकाचा मृत्यू झाला. अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून ही मोठी फांदी बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. या भागातील दिलेल्या वृत्तानुसार, या भागातील स्थानिकांनी या झाडासंदर्भात महापालिकेकडे तक्रार नोंदवली होती. मात्र महापालिकेने झाडाच्या फांद्या कापण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पोलिसांनी केला.हेही वाचा-

मिस्टर बिन यांची सर्वात महागडी कार पाहिलीत का?मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार

Trending Now