गणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारलीय.
मुंबई,19 आॅगस्ट : गिरगावातील गणेश मंडळांसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाजू घेतली. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे गणेश मंडळासाठी मैदानात उतरले आहे. गणेश मंडळांना होणाऱ्या अडचणींबाबत तोडगा काढण्यासाठी अमित ठाकरे यांनी आज मनसेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारलीय. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरले. बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा दरवेळी आमचे सण आले की बंधनांच्या गोष्टी कशा काय सुरू होतात ? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरगावच्या गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली.याबद्दलच गणेश मंडळांना होणाऱ्या अडचणींबाबत तोडगा काढण्याबाबत आज मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मंडळांना परवानगी मिळताना होणारा त्रास आणि मिरवणुकींचा बदललेला मार्ग याविषयी या बैठकीत चर्चा झालीये. यावेळी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, आजारातून बाहेर पडल्यानंतर अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. वडील राज ठाकरे यांच्यासोबत दौरा असो की सभा असो सर्व ठिकाणी अमित सोबत असतात. एका प्रकारे अमित आपल्या वडिलांकडून राजकारणाचे धडे गिरवत आहे. राज यांनीही मुलगा राजकारणात सक्रीय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सोशल मीडियावर सक्रीय राहण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नावाने एक फेसबुक पेजही तयार करण्यात आले. आगामी निवडणुकीत लवकरच अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमित ठाकरे कोणत्या भूमिकेत पाहण्यास मिळतात हे पाहण्याचं ठरणार आहे.PHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ