मंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी

ठाणे महानगरपालिकेच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने ठाण्यातील एकाही गणपती मंडपाला हात लावला तर त्यांचे हात छाटू अशी धमकी वजा इशारा ठाणे जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

अजित मांढरे, प्रतिनिधीठाणे, 18 ऑगस्ट : ठाणे महानगरपालिकेच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने ठाण्यातील एकाही गणपती मंडपाला हात लावला तर त्यांचे हात छाटू अशी धमकी वजा इशारा ठाणे जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. शिवसेना फक्त मराठीचा गाजावाजा करतेये पण या मराठी सणांना संपवण्याचे काम ही शिवसेना करतेये. गेली अनेक वर्षे ठाण्यात सेनेची सत्ता असताना देखील सार्वजनिक मंडळांना वाऱ्यांवर सोडलं जातंय. पण त्यांच्या पाठीमागे मनसे खंबीर पणे उभी असल्याचे देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मुर्ती बनवण्याकरता फुटपाथ तसंच इतर ठिकाणी रस्त्यावर खड्डे करून मंडप उभारले गेलेत. ते ठाणे मनपाने काही ठिकाणी काढले तर काही ठिकाणी काढण्याचे आदेश दिलेत. दुसरीकडे गेल्या वेळेस रस्त्यांवर खड्डेकरून मंडप उभारण्यास एका खड्ड्याला ५०० रुपये दंड होता तो आता २००० हजार रुपये दंड केला आहे. 500 रुपयावरुन ही रक्कम 2000 रूपये करण्यात आल्याने गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्ट्रेचरवरून मृतदेह खाली ठेवताना पोलीस कर्मचाऱ्याने मारली लाथ, VIDEO VIRALया सगळ्यात रस्त्यावंर खड्डे करून मंडप उभारा अशी अलिखित परवानगीच ठाणे मनपाने दिल्याची टिका ही मनपावर केली जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेनं गणेश मंडपाच्या मुद्द्याला चांगलच धरून ठेवलं आहे. रस्त्यांच्यामध्ये येणारे मंडप हटवण्याचे आदेश मुबई महापालिकेने दिल्यानंतर त्यावर गणेश मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यासंबंधी गणेशमंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मदत घेतली. त्यावर बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा आणि मंडप बांधा असे आदेश राज ठाकरे यांनी गणेशमंडळ अध्यक्षांना दिले.त्यावर आता हा मुद्दा ठाण्यातही पेटताना दिसत आहेत. त्यामुळे तोंडावर आलेला गणेशोत्सव कसा साजरा होणार याकडेच आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे. 

VIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...!

Trending Now