ठाणे, 26 जानेवारी : मुंबई (Mumbai), उपनगर (Mumbai Suburb), ठाणे (Thane) किंवा नवी मुंबईत (New Mumbai) स्वत:चं आपल्या हक्काचं एक घर व्हावं, असं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day) अवचित्त साधत एक गोड बातमी दिली आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने 5730 घरांची लॉटरी (CIDCO Lottery) जाहीर झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सिडकोने ही गृहनिर्माण योजना सर्वसामान्यांना भेट म्हणून दिली आहे. नवी मुंबई येथील तळोजा (Taloja) येथे ही 5730 घरे उभारली जाणार आहेत. सिडकोनं तळोजा नोडसाठी लॉटरी काढली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजनेच्या (PM Awas Yojna) लाभार्थींनादेखील याचा फायदा होणार आहे. एकूण घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 1524 घर उपलब्ध असतील तर उर्वरित 4206 सर साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत. या लॉटरीला आजपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल.
जास्त नागरिकांनी या लॉटरीचा लाभ घ्यावा, एकनाथ शिंदेंचं आवाहन
73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने 5730 घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विशेष सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले?
'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले
"देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी" ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा
Rajya Sabha Election: शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, संभाजीराजेंची भूमिका काय? लवकरच निर्णय करणार जाहीर
BREAKING: मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ
Sambhaji Raje: महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, "महाराज.... तुमच्या नजरेतलं स्वराज्य...."
LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video
मोठी बातमी : कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ; रुग्णवाढ कायम राहिली तर मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता
BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?
BIG BREAKING: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी
(Neha ने शेअर केला BIKINI लुक! रामचरणसोबत लग्नाच्या चर्चेने वेधलं होतं लक्ष)
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
"प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या माध्यमातून 5730 घरांच्या लॉटरीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होतेय. सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात आणि परवडेल अशा दरात चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाचं एक स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी 5730 घरांची लॉटरीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया जवळपास एक महिनाभर सुरु राहणार आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. सिडकोने आतापर्यंत ज्या योजना केल्या आहेत त्या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं चांगलं स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.