बायकोच्या सौंदर्याला घाबरला नवरा, कॉईल स्टँडने ओरखडून चेहरा केला विद्रूप

सध्या वाढती गुन्हेगारी पाहता आपला समाज कुठे चालला आहे, याचा आपण अंदाज लावूच शकतो. असाच एक विचित्र प्रकार घडला आहे.

मुंबई, 29 ऑगस्ट : सध्या वाढती गुन्हेगारी पाहता आपला समाज कुठे चालला आहे, याचा आपण अंदाज लावूच शकतो. असाच एक विचित्र प्रकार घडला आहे. एका व्यक्तिला भीती होती की त्याच्या सुंदर पत्नीवर गावकऱ्यांची वाईट नजर पडेल, म्हणून त्याने त्याच्या पत्नीचा चेहरा ओरबडला आणि विद्रूप केला. चेहरा विद्रुप करण्यासाठी त्याने चक्क मच्छर कॉईल लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टँडचा वापर केला.खरंतर हा व्यक्ती स्वत: मुंबईमध्ये इतर महिलांना वाईट नजरेने पहायचा. राज रायकवार अशा या इसमावर मुंबईमध्ये बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, राज हा मध्य प्रदेशच्या जबलपुरमधला रहिवाशी आहे. तो बॉलिवूडमध्ये कॅमेरामनचं काम करतो. त्यामुळे तो मुंबईमध्ये असतो आणि त्याचे कुटुंब हे जबलपुरमध्ये राहतं. 12 वर्षांआधी राजचं लग्न झालं होतं. त्याला 2 मुलंही आहेत. राजची बायको खूप सुंदर दिसते.

बरं इतकंच नाही तर राजने त्याच्या मुलांसोबतही अश्लिल प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा फ्रुटी देतो असं सांगून त्यांने त्याच्या मुलीला उचलून घेतलं आणि घरात नेलं. घरात त्याने त्याच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरूवात केली पण त्याच वेळी त्याला पकडण्यात आलं. या सगळ्या गंभीर प्रकाराविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे ? मग हे नियम जाणून घ्या

Trending Now