मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाला दिलासा नाही

मुंबई, 04 सप्टेंबर : 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. उद्यापासून सुरू होणाऱ्या आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. या तिघांविरोधात युएपीएची कलमं लागू होतील की नाही याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टाने घ्यावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे.मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 27 डिसेंबर 2017ला आरोपनिश्चीती केली होती. यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवण्यात आला होता. त्यामुळे या आरोपींना काहीसा दिलासा मिळाला होता.2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी  रमेश उपाध्याय आणि अजय रहीकर यांच्यावरचाही मोक्का हटवण्यात आला होता. यूएपीए कलम 17, 20 आणि 13 हटवण्यात आले होते. तसंच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटकादेखील केली होती.

याआधी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञा आणि आॅगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला होता. पुरोहित नऊ वर्ष तुरुंगात राहिले होते. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी होत्या. त्याप्रकरणी काही वर्ष त्यांना शिक्षाही झाली. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.दरम्यान, जामिनावर बाहेर असताना साध्वी प्रज्ञा यांनी अनेक वादग्रस्त विधान केली होती. हिंदू टक्का वाढला पाहिजे. देशासाठी मुले जन्माला घाला. तुमच्याने मुलांचा सांभाळ होत नसेल तर आम्ही सांभाळू असं खळबळजनक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलं होतं.मी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर  बांधायला ही जाईन असं धक्कादायक वक्तव्यही साध्वी प्रज्ञा  यांनी केलं होतं. त्या औरंगाबादेत एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या. VIDEO : याला कुणी आवरा रे...

Trending Now