उद्यापासून लोअर परेलचा रोड ओव्हर ब्रीज बंद होणार!

लोअर परेल स्थानकावरुन जाणारा रोड ओव्हर ब्रीज उद्या मंगळवारपासून वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद होणार असून हा पूल धोकादायक असल्याचं कारण रेल्वे आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून देण्यात येतंय. 

मुंबई, ता. 23 जुलै : लोअर परेल स्थानकावरुन जाणारा रोड ओव्हर ब्रीज उद्या मंगळवार २४ जुलैपासून वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे. हा पूल धोकादायक असल्याचं कारण रेल्वे आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून देण्यात येतंय. अंधेरी रेल्वे पुल दुर्घटने नंतर पश्चिम रेल्वे, आयआयटी आणि महानगरपालिकेनं केलेल्या सर्व्हेनंतर लोअर परेलचा हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पुढे आले आहे.शूटआऊट अॅट नालासोपारा, भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटरमुंबईतील लोअर परेल हा अत्यंत वर्दळीचा आणि गर्दिचा भाग आहे. मुंबईतील बहुतांश कार्यालये ही या परिसरात असल्यामुळे लोअर परेल स्थानकावरुन जाणारा रोड ओव्हर ब्रीजवर कायम गर्दी असते. अंधेरी रेल्वे पुल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे, आयआयटी आणि महानगरपालिकेच्यावतीने सर्व पुलांची युद्धस्तरावर पाहणी करण्यात येतेय. लोअर परेल स्थानकावरुन जाणाऱ्या रोड ओव्हर ब्रीजची पाहणी केल्यानंतर तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सर्व्हेक्षण अधिकार्यांनी स्पष्ट केलयं. मंगळवारपासून हा ब्रीज रहदारीसाठी बंद करण्याचा र्निणय प्रशासनाने घेतलाय. लोअर परेलचा ओव्हर ब्रीज बंद केल्यानंतर करी रोड, डिलाईड रोड आणि एलफिन्स्टन (प्रभादेवी) पुलावर वाहतूकीची कोंडी बघायला मिळणार हे मात्र निश्चित!

विदर्भातील ५ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधाहाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोलऔरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'  

Trending Now