लालबागच्या राजाचं पाद्यपुजन, राजाची मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरवात!

सर्व गणेशभक्तांचं अराध्यं दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं आज पाऊल पूजन सोहळा झाला.

Ajay Kautikwar
मुंबई,ता,19 जून : पावसाळा सुरू झाला की चाहूल लागते ती सण उत्सवांची. त्यातही महाराष्ट्राचा महाउत्सव गणेशोत्सवाची. मुंबईत सगळ्यांचं लक्ष लागतं ते लाखो भक्तांचं आराध्यस्थान असणाऱ्या लालबागच्या राजाच्या पाऊल पुजनाने. सर्व गणेशभक्तांचं अराध्यं दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं आज पाऊल पूजन सोहळा झाला.राजाचं पाद्यपुजन म्हणजे गणेश मूर्ती घडवण्याची सुरूवात असते. लालबाग मार्केटमध्ये संध्याकाळी हे पाऊल पूजन करण्यात आलं. लालबागचा राजाच्या पाऊल पूजन सोहळ्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी आलेत.लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनासाठी खास फुलांची दावट करून आरास करण्यात आलीय. लालबागच्या राजाची मूर्ती घडविण्यास आता सुरवात होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांची ही लगबग आता वाढत जाणारेय.

हेही वाचा...भयंकर! नागपूरमध्ये गुप्तधनासाठी केला बहीण आणि कुटुंबाचा खून बायकोला दाढी आहे म्हणून मागितला घटस्फोट, काय म्हणालं कोर्ट?चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का? अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम! अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र

Trending Now