मुंबई, 25 जानेवारी : मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसणे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somiya)यांना महागात पडणार असे चिन्ह आहे. या प्रकरणी प्रशासनाने सोमय्यांना नोटीस बजावली आहे. तसंच, संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी नगरविकास खात्याच्या विभागाला भेट दिली होती. यावेळी एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून ते फायली चाळत होते. याबद्दलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या फोटोमध्ये नगरविकास विभागाचे अधिकारी हे उभे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांच्यावर विहंग इमारतीच्या बांधकामावरून गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हा फोटो आता समोर आला आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली आहे. किरीट सोमय्यांना यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
परंतु, या कारवाईवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. 'सोमय्या अधिकऱ्यांच्या खुर्चीवर बसले म्हणून कारवाई करणे निषेधार्य आहे. हा मोघलाईचा कारभार सुरू आहे. लहर आली की लगेच निलंबित करा असे सुरू आहे. यापूर्वी कुठला नेता अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसला नाही का? असा सवाल दरेकरांनी विचारला.
BREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा
पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा
माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा
BREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब
OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान
Davos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार
Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स रद्द
Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी
EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी
BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांच्या या फोटोवर आक्षेप घेतला आहे. सदर मंत्रिमंडळातील टिप्पणी ही पुढील बैठकीत इतिवृत्तांत जोपर्यंत मंजूर केली जात नाही तोपर्यंत माहिती अधिकारात उपलब्ध केली जाऊ शकत नाही व गोपनीय स्वरुपात मोडते. त्यामुळे या टिप्पणीला इतिवृतांतात मंजुरी मिळाली का? नसेल तर सोमय्या यांना कशी मिळाली याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीच सावंत यांनी केली.
(नक्की कुठून करावी अभ्यासाची सुरुवात? वाचा उत्तम मार्क्स मिळवण्याचा गुरुमंत्र)
तसंच, किरीट सोमय्या कोणत्या अधिकाराखाली याठिकाणी गेले होते. ते तिथे कोणत्या फायली तपासात होते, हे त्याच मानसिकतेचं दर्शन आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सावंत यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.