नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 21 मार्च : जग भ्रमंती करण्याची आवड ही गेल्या अनेक शतकांपासून कायम आहे. यापूर्वीच्या शतकात समुद्रमार्गे जगाची भ्रमंती केली जात असे. नव्या संशोधनानंतर दळणवळणाची साधनं वाढली. त्याचा फायदा पर्यटकांना झाला. जगभ्रमंतीची अनेक माध्यमं त्यांना उपलब्ध झाली. सध्या बाईकहून जगाची भ्रमंती करण्याची अनेक रायडर्सची इच्छा असते. कऱ्हाडमधील एक तरुणही आता मुंबई ते लंडन हा प्रवास बाईकनं करण्यासाठी सज्ज झालाय.
कसा आहे प्रवास?
Sanjay Raut : आता निर्णय घेण्याची वेळ आलीये; राऊतांचं पंकजांना आवाहन, भाजपवर गंभीर आरोप
LIVE : शहाजीबापूंनी धरले जयंत पाटलांचे पाय, सोलापुरात दोन्ही नेत्यांची भेट
Mumbai News : धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!
Bhiwandi Accident : धावत्या रिक्षाचा ब्रेक फेल अन् समोर 20 फूट खड्डा, चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू
Mumbai News : आधी उकाडा आता पाणी, मुंबईकरांचं काही टेन्शन संपत नाही, पाणी जपून वापरा रे!
Sachin Tendulkar : कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा वाद सचिनच्या घरापर्यंत, बंगल्याबाहेर पोस्टरबाजी
Shivrajyabhishek Din 2023 : रायगडावर शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी; सोहळ्यासाठी शिवभक्तांची गर्दी
Live Updates : स्टेट बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डानं केली घोषणा
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या, सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल
Sushma Andhare : शिरसाटांच्या क्लिन चिटवर अंधारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या राज्याचे गुणी गृहमंत्री...
Mumbai Weather Update : जून सुरू झाला, उन्हाचा कडाका कमी होईल का? मुंबईचं तापमान आज...
योगेश आलेकारी असं या तरुणाचं नाव आहे. योगेश नुकताच मुंबईमध्ये आला होता. त्यावेळी त्यानं त्याचा आजवरचा अनुभव तसंच जगभ्रमंतीबाबत माहिती दिली. गेल्या सहा ते सात वर्षांपासून योगेश बाईक रायडींग करत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील गडकिल्ले ट्रेकिंग करून, बाईक रायडींग करून सर केले त्यानंतर भारतात 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त बाईक रायडींग केलंय.
योगेशनं आता मुंबई ते लंडन असा बाईकनं प्रवास करण्याचा निश्चय केलाय. तो 24 देश आणि 3 खंडांमधून 25000 किलोमीटर प्रवास करणार आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी त्याचा हा प्रवास सुरू होणार असून 100 दिवसांमध्ये तो हा प्रवास पूर्ण करेल.
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी अनुभली मायेची ऊब, 'या' महिलांकडून मिळतंय मोफत जेवण, Video
योगेशच्या डोक्यात गेल्या 4 वर्षांपासून हा प्लॅन होता. त्यानं यापूर्वी नेपाळ, भूतान, म्यानमार बॉर्डर, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांमध्ये बाईकनं प्रवास केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाईक राईडचा प्लॅन करणं सोपं नसतं याची त्याला जाणीव आहे. प्रत्येक देशात जाताना वेगवेगळे कागदपत्र तसेच स्वतःची बाईक न्यायची असल्यास बाईक पासपोर्ट, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स अश्या विविध गोष्टी यासाठी गोळा कराव्या लागतात. हे सर्व गोळा करण्यात मी वर्षभरापूर्वीच कामाला लागला होतो. या कालावधीमध्ये एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही, असं योगेशनं सांगितलं. त्याला या प्रवासासाठी 30 लाखांपर्यंतचा खर्च येणार आहे.
काय घ्यावी लागते काळजी?
बाईक राईड करताना फिजिकल फिटनेसबरोबरच बाईकचा फिटनेसचीही काळजी घ्यावी लागते. ऊन, वारा, पाऊस, वादळ या प्रकारच्या वेगवेगळ्या नैसर्गिक बदलांना समोर जाऊन टार्गेट पूर्ण करावं लागतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ खावे लागतात. कारण, ते त्या भागात मानवेल असं अन्न असतं. तसंच भरपूर पाणी देखील प्यावं लागतं.
मुंबईकर मेधानं बाईकवर केला 25 हजार किलोमीटर प्रवास, पाकिस्तानबद्दल म्हणाली... Video
कसा असेल प्रवास?
योगेश आशिया, युरोप, आफ्रिका हे तीन खंड फिरणार आहे. 1 मे रोजी तो मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून निघणार आहे. मुंबई ते नेपाळ बाईक राईड करून पुढे विमानाने यु ए ई पर्यंत जाईल तेथून इराण, तुर्की, ग्रीस, इटली, ऑस्ट्रीया,झेक,जर्मनी, लक्सेमबर्ग,बेलजीअम, नेदरलँड, फ्रांस, लंडन पून्हा फ्रान्स, स्विस पुन्हा फ्रांस, मोरक्को व स्पेन असा बाईकने प्रवास करून स्पेन येथून भारतात विमानाने परतणार आहे. अश्या पद्धतीने बाईकस्वारीचा थरार अनुभव तो घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Bike, Local18, Mumbai, Travel