तोडगा निघत नसल्यानं जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच

काल जेजे रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती.

Renuka Dhaybar
मुंबई, 20मे : जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज दुसऱ्या दिवशीही संपावरच आहेत. काल जेजे रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती.यासंबधी जे जे मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संप मिटवण्यासंदर्भात आज निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड' आणि वैद्यकिय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक प्रकाश वाकोडे यांची बैठक पार पडली.या बैठकीत आश्वासनापलिकडे काहीही हाती लागलं नसल्याची खंत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र प्रकाश वाकोडे यांनी याविषयी सखोल माहिती देण्याचं टाळलं. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे.

Trending Now