बलात्कारी निर्मात्याला सहा वर्षांनी झाली शिक्षा

घडल्या प्रकाराबदद्ल कोणाला सांगितले तर मुलीसह तिला जीवे मारण्याची धमकी मिश्राने दिली होती

मुंबई, २६ जुलैः  हिंदी मालिकेचा निर्माता मुकेश मिश्रा (३३) याने सहा वर्षांपूर्वी वीरा मालिकेतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. बुधवारी सत्र न्यायालयाने त्याला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडित महिला ही मिश्राच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होती. १२ डिसेंबर २०१२ रोजी मिश्राने सर्व टीमला जोगेश्वरी स्थानकाजवळ बोलावले. पीडिता तेथे पोहोचली तेव्हा फक्त मिश्राच तेथे उपस्थित होता. बसला यायला उशिर होत असल्यामुळे मिश्राने पीडितेला त्याच्या दुचाकीवरून स्टुडिओमध्ये नेले. तेथे मिश्राने तिच्यावर बलात्कार केला. घडल्या प्रकाराबदद्ल कोणाला सांगितले तर मुलीसह तिला जीवे मारण्याची धमकी मिश्राने दिली होती. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी रायकर यांनी नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. खटल्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी मिश्राला दोषी ठरवून सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हेही वाचा- 

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरेमाझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडेमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

Trending Now