VIDEO : राम कदमांनी अभिनेत्रीसाठी गोविंदाला सातव्या थरावरून खाली उतरवलं..!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्री प्राची देसाईला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी ...

मुंबई, 04 सप्टेबर : मुलीची लग्नासाठी इच्छा नसेल तर पळवून आणू असं वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम अडचणीत सापडले आहे. आता आणखी एक राम कदम यांचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत सातव्या थरावरून राम कदम यांनी एका अभिनेत्रीसाठी खाली उतरवले आहे. त्यामुळे राम कदमांकडून गोविंदांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येतोय. भारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केल्याचा दावा करणाऱ्या राम कदमांची जीभ घसरली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्री प्राची देसाईला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी

सातव्या थरापर्यंत चढलेल्या गोविंदाला राम कदम यांनी बळजबरीने खाली उतरवलं. त्यामुळे गोविंदा पथकाचा हिरमोड झाला. त्यामुळे दहीहंडीचं आयोजन कोणासाठी? गोविंदा पथकासाठी? असा सवाल उपस्थितीत झाला. त्याआधी यापुढे लग्नाला नकार देणाऱ्या मुली पळवण्यासाठी तरूणांनी राम कदमांना फोन केला तर आश्चर्य वाटायला नको..कारण खुद्द राम कदमांनीच तसं आवाहन केलंय. तुमचे आईवडील म्हटले, साहेब आम्हालाही पोरगी पसंत आहे,तर काय करणार मी? लग्न करून द्यायचं, तिला पळवून आणणार....मुलीचा विरोध असला तरी लग्नासाठी मुलगी पळवून आणण्याचा विडाच राम कदमांनी उचललाय.मात्र आपण कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलं नाही असा दावा राम कदम करताहेत.आपण कार्यकर्त्यांचे कैवारी असण्याचं भासवण्यासाठी, उत्साहाच्या..नव्हे नव्हे... अतिउत्साहाच्या भरात राम कदमांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर आता चोहोबाजूंनी टीकेची झोड उठलीय.रक्षाबंधनाला हातभर राख्या बांधून घेणारे. मतदारसंघातील वृद्धांना काशी यात्रा घडवण्याचं पुण्य मिळवणारे... याच कार्यक्रमात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी दोनदा राष्ट्रगीत म्हणायला लावणारे....शत्रूला पळवून लावणाऱ्या सैनिकांना सलामी देणाऱ्या राम कदम यांना मुली पळवण्याचं वक्तव्य का बरं करावं लागलं.वेळोवेळी माता-पित्याच्या सेवेची शिकवण देणाऱ्या या रामाच्या मुखी, 'रावणी' कृत्याला प्रोत्साहन देणारे शब्द निघाल्यानं सगळ्यांचाच भुवया उंचवल्यात.राम कदमाचं नाव राम बदलून रावण ठेवा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जाहिरातीतल्या महिलांच्या प्रदर्शानमुळं बलात्कार वाढतात असा जावईशोध मुंबईतल्या मालाडचे भाजपचे नगरसेवक राम बरोट यांनी केला होता. मात्र मालाडमधल्या रामाकडून महिलांची झालेली अवहेलना कमी होती म्हणून की काय, घाटकोपरच्या रामानं त्यावरही कडी केली.उत्साहाच्या भरात केलेल्या बेताल वक्तव्याची राजकारणातकिती मोठी किंमत मोजावी लागते याचा प्रत्यय वेळोवेळी आलाय.मात्र तरी देखील आपले नेते मंडळी, बडे बडे प्रोग्रॅम में छोटी छोटी बातें होती रहती है, अशा अविर्भावात वावरतात...मात्र जनता अशा अनेक गर्वांच्या हंड्या फोडते, असा इतिहास आहे...याची नेतेमंडळींनी नक्की नोंद घ्यावी..राम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO

Trending Now