घाटकोपरमध्ये कदमांविरोधात एफआयआर दाखल करण्यास पोलिसांचा नकार

मुंबई, 05 सप्टेंबर : भाजप आमदार राम कदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात एफआरआय दाखल करून घ्यायला पोलिसांनी नकार दिलाय. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण घाटकोपरमधील चिरागनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास गेल्या असताना हा प्रकार घडलाय. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास विरोध केल्यानंतर विद्या चव्हाण यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन केलंय. या संपूर्ण प्रकारानंतर आमदार राम कदम यांच्यावर कारवाई कधी होणार तसंच या संपूर्ण प्रकरणावर भाजप गप्प का ? असा संतप्त सवाल विचारला जातोय.

दरम्यान, आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यानंतर राज्यभरात कदम यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेसोबत राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या रोष व्यक्त केलाय.राष्ट्रवादीचं कदमांच्या फोटोला जोडेमार आंदोलनराम कदम यांच्या विरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत कदम यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन केलं. राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राम कदम यांनी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केलाय. भाजपने आशा बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराला पाठीशी घालू नये अशी मागणी करत, राम कदम यांनी जाहीर माफी मागून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी महिलांनी केलीये. काँग्रेस महिलांनी दाखवल्या बांगड्या ठाण्यात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार राम कदम यांचा निषेध केलाय. राम कदम यांच्या फोटोला चपला मारुन तसंच बांगड्या दाखवून काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राम कदम यांचा निषेध केलाय. संभाजी ब्रिगेडकडून जोडे मारो आंदोलनभाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर सोलापुरात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरात सर्वत्र निषेध केला जातोय. राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारुन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलनकर्त्यांकडून पोस्टर हिसकावून घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

Trending Now