समलैंगिक पार्टनरने केला घात, रेल्वे स्थानकाजवळ गळा चिरून केली हत्या

या प्रकरणाची कुठून चौकशी करायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता

मुंबई, ३१ ऑगस्ट- चार दिवसांपूर्वी मालाड- गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ निर्दयीपणे हत्या करण्यात आलेल्या रामेश्वर मिश्रा (५०) यांच्या हत्येप्रकरणी जीआरपी क्राइम ब्रांचने मिश्राचा समलैंगिक पार्टनर सलीम अली अन्सारी याला अटक केली आहे. रामेश्वरची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. अटकेनंतर सलीमने पोलिसांना माहिती देताना म्हटले की, रामेश्वरकडून त्याने २६ हजार रुपये घेतले होते. अन्सारीने २६ हजार रुपये दिले नाही तर त्या दोघांच्या नात्याबद्दल मिश्रा अन्सारीच्या घरी सांगणार होता.'या प्रकरणाची कुठून चौकशी करायची हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. अखेर आम्ही मालाड पूर्वेकडील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे ठरवले,' असे जीआरपी क्राइम ब्रांचचे सिनिअर इन्स्पेक्टर संतोष धनवते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिश्रा अन्सारीसोबत दिसला. फुटेजमधील माणसाचा शोध घेताना तो मालाड येथील एका डेअरीमध्ये काम करत असल्याची टीप मिळाली. तेथूनच अन्सारीला पोलिसांनी ताब्यात घेतले.२५ ऑगस्ट रोजी दोघंही रेल्वे ट्रॅकजवळ दारू प्यायल्या बसलेले. तेव्हा मिश्राने २६ हजार रुपये परत देण्याच विषय काढला. तेव्हा रागात अन्सारीने मिश्राची गळा चिरून हत्या केली. सध्या अन्सारी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर खूनाचा आरोप लावण्यात आला आहे, असे डीसीपी पुरूषोत्तम करड यांनी सांगितले.

VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

Trending Now