'लालबागचा राजा मंडळा'ला ६० लाखांचा दंड

दंडाची रक्कम कमी असताना जर भरली गेली असती तर आज एवढा मोठा आकडा झाला नसता. मात्र पालिकेच्या दंडाकडे दुर्लक्ष केल्यानं या रकमेवर व्याज लागले.

Sonali Deshpande
अक्षय कुडकेलवार, मुंबई, 19 एप्रिल : लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळावर अनाधिकृत खड्ड्याप्रकरणी ६० लाख ५१ हजारांच्या दंडाची रक्कम पालिकेला देणं आहे. २०१२मध्ये रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खड्डे खणण्यात आले होते. मात्र ते खड्डे बुजवण्यात आले नाहीत, असा पाठपुरावा स्थानिक रहिवासी महेश वेंगुर्लेकर यांनी केला होता. त्यानंतर पालिकेनं खड्ड्याप्रकरणी मंडळाला दंड ठोठावला होता.हीच दंडाची रक्कम व्याजासह आज ६० लाख ५१ हजारापर्यंत पोहचलीय. मंडळाचे सचिव सुधीर साळवी हे शिवसेना पदाधिकारी असल्यानं महापालिका अधिकाऱ्यावर रक्कम वसूल न करण्यासाठी दबाव आणतात असा आरोप महेश वेंगुर्लेकर यांनी केलाय.दंडाची रक्कम कमी असताना जर भरली गेली असती तर आज एवढा मोठा आकडा झाला नसता. मात्र पालिकेच्या दंडाकडे दुर्लक्ष केल्यानं या रकमेवर व्याज लागले. लालाबागच्या राजाला येणाऱ्या देणगीतून ही  रक्कम पालिकेकडे जमा केली जाईल. त्यामुळ हा भक्तांच्या देणगीचा गैरवापर नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो

Trending Now