इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांचीच, बिल्डराच्या उलट्या बोंबा

News18 Lokmat
मुंबई, 23 आॅगस्ट : इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी ही तिथल्या रहिवाशांचीच असल्याचा अजब दावा क्रिस्टल टॉवरचा बिल्डर अब्दुल रझाक सुपारीवालान कोर्टात केलाये. त्यामुळं आगीची जबाबदारी बिल्डरनं झटकलीये.बुधवारी परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागून चार जणांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर पोलिसांनी बिल्डर अब्दुल रझाक सुपारीवालाला अटक केली आणि आज त्याला भोईवाडा कोर्टात हजर केलं असताना त्यानं इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची असल्याचं म्हटलंय. यानंतर सुपारीवालाला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.इमारतीच्या अग्नीसुरक्षेची जबाबदारी तिथल्या रहिवासीयांचीच, क्रिस्टल आग प्रकरणी आरोपी सुपारीवाला याच्या वतीनं कोर्टात अजब दावा केला. या प्रकरणी अग्नीशमन दलाच्या वतीनं पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही हे फ्लॅट विकण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात आला. तसंच या इमारतीत आग विझवण्याच्या दृष्टीनं कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती असंही पोलिसांनी कोर्टाला सांगितलं.

तसंच या इमारतीच्या ८ व्या मजल्यावर एक अनधिकृत बांधकाम आहे आणि एका अनधिकृत बांधकामावर बीएमसीनं हातोडा चालवला आला होता अशीही माहिती कोर्टाला देण्यात आली. या अशा बेकायदा बांधकामामुळे इमारत राहण्यास धोकादायक असल्याचा युक्तीवाद पोलिसांनी केला.तसंच या प्रकरणी सुपारीवाला याचे इतर सहकारी यात सहभागी होते का याची माहिती घ्यायची असल्यानं त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली. तर बचाव पक्षानं २०१२ पासून आम्ही रहिवासीयांना सोसायटी स्थापन करण्यास सांगितले तरीही त्यांनी ती स्थापन केली नाही असं म्हणत आपली जबाबदारी पूर्णपणे झटकली.सोसायटी स्थापन करुन अग्नी सुरक्षेची व्यवस्था लोकांनी करणं आवश्यक होतं, असं बचाव पक्षानं म्हणत आगीचं सगळं खापर रहिवासीयांवर फोडलं आहे. तसंच २०१२ पासून आम्ही ओसी आणि अग्नीसुरक्षेचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केलाय पण आम्हाला ती प्रमाणपत्रं मिळाली नाहीत असं म्हणत बीएमसीलाही दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलाय.PHOTOS : तिच्या अंगात राक्षस होता,आईने 4 महिन्याच्या मुलीचा कापला ब्लेडने गळा !

Trending Now