मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

मुंबई, 28 जुलै :  मराठा समाजाला आताचे आरक्षण कायम ठेवून आरक्षण देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्य मागास आयोगाने मराठा समाजाबद्दलचा अहवाल शक्य ते लवकर दिला तर त्यानंतर लगेच विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.VIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. विधान भवनात ही बैठक पार पडली. याआधी विनोद तावडे यांच्या सेवासदन या सरकारी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी नेत्यांची मराठा आरक्षणाबाबत गुरुवारी रात्री चर्चा झाली होती. आज सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी, काँग्रेसचे आमदार हजर होते.

Addressing media after all party meeting on Maratha reservation issue at Vidhan Bhavan, Mumbai. https://t.co/PKo2vSLI4m

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2018दापोली ते आंबेनळी घाट - 'त्या' चार तासांत काय घडलं ?या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही मागेही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले. आरक्षणाची पूर्ण प्रयत्न केला. मात्र कोर्टात युक्तीवाद टिकू शकला नाही. पण आताच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लवकरच विशेष अधिवेशनही बोलवण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

बसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

तसंच आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात येतील. पण हे जाहीर करत असताना आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ले, जाळपोळ, यासारख्या गंभीर गुन्हे कायम ठेवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Trending Now